कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना राग अनावर   

भर सभेत पोलिस अधिकार्‍याला खडसावले

बंगळुरु : आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा टीकेचे धनी झालेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या एका सभेमध्ये सिद्धारामैय्या यांना राग अनावर न झाल्याने  त्यांनी पोलिस अधिकार्‍याला खडसावत त्या अधिकार्‍याला मारण्यासाठी हातवर केला. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
 
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या हे काँग्रेसच्या एका सभेसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी काही आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. या प्रकारामुळे सिद्धारामैय्या नाराज झाले. मुख्यमंत्र्यांनी सभेच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत धारवाडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण बरमानी यांची खरडपट्टी केली. यावेळी त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी पोलीस अधिकार्‍यांवर हात उगारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिद्धारामैय्या यांचा हा पवित्रा पाहून हे पोलीस अधिकारी मागे हटले.

Related Articles